|

सौ सुशिलाबाई वीरकर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन साजरा

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : आदर्श शिक्षण मंडळाच्या सौ. सुशिलाबाई वीरकर हायस्कूल प्रशालेतील सन २००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेह मेळावा शालेय परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने आजी व माजी मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सेवक वर्ग यांना खास आमंत्रित करून त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला. शाळेच्या बाहेरील आवारात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मावशींचा सुद्धा या विद्यार्थ्यांकडून सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व माजी विद्यार्थी शाळेबद्दल माहिती असलेला एक विशेष टी-शर्ट परिधान करून आले होते.

शालेय जीवन सोडून पंचवीस वर्षे पूर्ण करणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांनी आपणही शाळेचे देणे लागतो या भावनेतून प्राथमिक शाळेसाठी ५७६ वह्या, तसेच माध्यमिक हायस्कूल साठी एक मोठा स्क्रीन प्रोजेक्टर आणि शैक्षणिक साहित्य आणले होते. विद्यार्थ्यांनी शाळेचं रूप बदलून टाकणारी गोष्ट म्हणजे सर्व शाळेचा आतील व बाहेरील परिसराचे छानसे रंगकाम केले आहे. खास लहान मुलांना आकर्षित होईल व इतर शैक्षणिक गोष्टी त्यातून कळतील अशा स्वरूपाचं काम आर्टिस्ट लोकांकडून करून घेतलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप नागरे व केयुर कुलकर्णी या माजी विद्यार्थ्यांनी केले होते.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!