
लोकनीती न्युज नेटवर्क
वारजे : संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने नुकतीच मा उप महापौर दिलीप बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केले. या प्रसंगी पुण्यनगरीचे मा.उपमहापौर दिलीप बराटे, संस्थेचे खजिनदार अविनाश जाधव, संस्थेचे सहसचिव अभ्युदय बराटे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डाॅ.संदीप सांगळे, डाॅ.पाडुरंग कंद, डाॅ शैलेश त्रिभुवन, प्रभारी प्राचार्य डाॅ.धनंजय त्रिमुखे, उपप्राचार्य प्रा आशुतोष कसबेकर, स्पर्धेचे मुख्य संयोजक डाॅ.राजेंद्र थोरात, सुजित काळंगे, रोहन कवडे उपस्थित होते. राज्यभरातून ६३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण डाॅ.श्रीराम गडकर व डाॅ.प्रवीण ताटे देशमुख यांनी केले.

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप बराटे म्हणाले, विद्यार्थांच्या सर्वागीण विकासासाठी वाचन, लेखना बरोबरच प्रभावी वक्तृत्व गरजेचे आहे.वर्तमानात तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होत असताना विद्यार्थांनी कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रथम क्रमांक गोविंद भांड, बी जे एस महाविद्यालय, वाघोली, द्वितीय क्रमांक चैतन्य बावधने, फर्ग्युसन महाविद्यालय तर तृतीय क्रमांक यश पाटील, महात्मा फुले महाविद्यालय, पनवेल यांना मिळाला. स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली.