|

महिला सक्षमीकरणात सिम्बॉयसिस करणार गुडविलला मदत -डॉ मुजुमदार

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : सिम्बॉयसिस विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष शा.ब. मुजुमदार यांच्या हस्ते गुडविलच्या कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत काजल गाडे व अश्विनी चव्हाण या दोन गरजू मुलींना त्यांच्या होणाऱ्या लग्नात भांड्यांचा संच, साडी व चप्पल (झालं) भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी कोंढवे गावचे माजी सरपंच नितीन धावडे, उद्योजक अमित चोरगे पत्रकार प्रसाद घारे व सावरकर प्रेमी संघटनेचे विवेक विप्रदास उपस्थित होते. महिला सक्षमीकरणात गुडविलने गेल्या बारा वर्षात अशा प्रकारचे जवळपास १००० भांड्याचे संच दिल्याचे गुडविल इंडिया च्या वतीने सांगण्यात आले. तसेच या सक्षमीकरण मोहीमे मध्ये आत्तापर्यंत सत्तर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती गुडविल इंडियाचे अध्यक्ष कालिदास मोरे यांनी दिली.

याप्रसंगी डॉ मुजुमदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, भारत देशाला विकसित करावयाचे असेल तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण महिला या पुरुषांपेक्षा जास्त जबाबदारीने, मेहनतीने दिलेले काम पार पाडत असतात. गुडविल इंडिया सारखी संस्था विविध मार्गांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करीत आहे. यासाठी समाजात गुडविल सारख्या अनेक संस्था आणि कालिदास मोरे यांच्या सारख्या अनेक व्यक्ती निर्माण होण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी महिलांच्या शिक्षणावर देखील भर द्यावा हे सुचविले.सोबतच गुडविल मधील महिलांनी शिवलेले कपडे त्यांना दाखविण्यात आले त्याची गुणवत्ता व आकर्षकता पाहून त्यांनी प्रशंसा केली.

याप्रसंगी गुडविल मधील महिलांना सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी अजून शिवणकाम देईल याशिवाय अजून इतरही कामात कशी मदत करता येईल याचा आढावा घेण्यात येईल असे सांगितले.
सरपंच नितीन धावडे यांनी गुडविल इंडिया करीत असलेल्या कामाची प्रशंसा करताना डॉ शा.ब. मुजुमदार आणि कालिदास मोरे हे आम्हा तरुण कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श उदाहरण असून तरुणांसाठी मार्गदर्शक व ऊर्जा स्त्रोत आहेत असे नम्रपणे नमूद केले.
यावेळी गुडविल इंडिया टीमच्या स्वाती पाटील, महेश मरोळ, स्वप्निल माळी व महेश कुलकर्णी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सर्डीकर आणि आभार प्रदर्शन विवेक विप्रदास यांनी केले.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!