
लोकनीति न्युज नेटवर्क
शिवणे : कोंढवे धावडे येथील ज्ञानेश्वरी रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्थेची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक बिनविरोध झाली असून पुणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास मोरे यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि निकाल घोषित केला. दरम्यान सन २०२४ ते २०२९ या पंचवार्षिक साठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी कऱण्यात आल्या. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख, सचिव अक्षय बन्ने, खजिनदार राजेंद्र गायकवाड तसेच संचालक मंडळाच्या सदस्यपदी नितीन भामे, गिरीश कट्टी, दत्ता चव्हाण, मेघ शर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.