
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत शाळेत मराठी भाषा दिन व वि.वा. शिरवाडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी आपल्या कवितेतून मराठी भाषेविषयी माहिती सादर केली. प्राचार्या संगीता सावंत, उपमुख्याध्यापक शिवराम साबळे, पर्यवेक्षक अंकुश खोपडे यांनी मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. वेदांत धावडे या विद्यार्थ्यांने पोवाडा सादर केला तर शशांक कुंभार या विद्यार्थ्यांने स्वरचित कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, ग्रंथपाल कवियीत्री मीना शिंदे यांच्या हस्ते झाले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख मीनाक्षी जगताप, हेमलता खरमाळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी सुवर्णा सोनवणे, अनिता गायकवाड, रेश्मा गायकवाड हे उपस्थित होत्या. आभार शिवानी कुरे या विद्यार्थिनीने मानले. विद्यालयातील ग्रंथपाल ज्ञानेश्वर रासकर, शिक्षक रविंद्र गोलांडे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.