
लोकनीती न्युज मीडिया
पुणे : शिवणे व धायरी येथील देशपांडे अकॅडमीने आयोजित केलेली DL Genius Grant Exam (DLGGE) ही प्रतिभा शोध परीक्षा उत्साहात पार पडली. सुमारे 100 हुन अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.या विशेष उपक्रमाचा उद्देश म्हणजे इंजिनिअरिंग (JEE), मेडिकल (NEET) आणि एनडीए सारख्या राष्ट्रीय परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना योग्य मार्गदर्शन व शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे हा आहे.या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 100% पर्यंत शिष्यवृत्ती तसेच देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

देशपांडे अकॅडमीचे संचालक श्री. योगेश देशपांडे आणि श्याम लोले यांनी सांगितले की, “शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्या भागातील लपलेली प्रतिभा शोधून त्यांना मोठ्या व्यासपीठावर नेणे, हे आमचे ध्येय आहे.

“विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “ही परीक्षा फक्त चाचणी नसून आमच्या क्षमतेची खरी ओळख करून देणारा अनुभव होता.”लवकरच अशाच स्वरूपाची आणखी एक परीक्षा आयोजित होणार असल्याचे अकॅडमीकडून सांगण्यात आले आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी पुढील नोंदणीसाठी संपर्क साधावा : धायरी शाखा: 9764647103 शिवणे शाखा: 8087800854