ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

लोकनीती न्यूज मीडिया:
पुणे : ओंकार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, करिअर मार्गदर्शन शिबिर आणि शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणादायी मार्गदर्शन. याप्रसंगी मराठी भाषा मंडळाचे संचालक आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केशव देशमुख अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

तर वि. दा. पिंगळे, श्याम ओक, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात विशेष रंग भरवणारी ठरली.कार्यक्रमात बारावीतील ओजस देशपांडे, तेजल गव्हाणे, सार्थक भास्कर, हर्षदा शेलार आणि ऋतुजा भांडवलकर यांना, तसेच दहावीतील गुरुराज धोंगडे, सई धडपळे, मिहीर आपटे, आदर्श सातपुते आणि भार्गव मराठे यांना सन्मानचिन्ह व शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.विशेष म्हणजे, महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळणारी आणि दहावीच्या परीक्षेत ८३% गुण मिळवणारी पलक निलेश वरपे हिचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या मेहनतीत आईवडिलांचा मोलाचा वाटा असल्याची कबुली दिली गेली.

या कार्यक्रमात पाचशेहून अधिक विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला ॲडव्हान्स डॉक्युमेंट फोल्डर भेट देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाताई दहीवळकर यांनी केले, तर ट्रस्टचे सचिव स्वप्निल लक्ष्मी दुधाने यांनी पुढील उपक्रमांचे संकेत देत उपस्थितांचे आभार मानले.
“समाजासाठी काहीतरी देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असे म्हणत त्यांनी ओंकार ट्रस्टच्या पुढील उपक्रमांची हमी दिली.
स्वप्निल लक्ष्मी देवराम दुधाने
सचिव- ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट
अध्यक्ष – कोथरूड विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष