|

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून ५१ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे

लोकनीती न्युज नेटवर्क 

उत्तमनगर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवणे येथे ५१ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस वृक्षारोपण करून साजरे करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघ, शिवणे आणि राजीव पाटील सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या वाढदिवसानिमित्त एक वृक्ष लावण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतानाच सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतू या उपक्रमामागे होता.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राम कुलकर्णी, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष राजीव पाटील, श्रीकृष्ण बराटे, सुभाष नाणेकर, सरपंच नितीन धावडे, अरुण दांगट, उमेश सरपाटील, राकेश सावंत, चेतन गोंडाल, परशुराम यादव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघ व फाउंडेशनचे सदस्यांनी मेहनत घेतली. उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, असे मत व्यक्त केले.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!