|

राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ

पुणेः राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता 30 एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरबी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला यासंबंधीचे सर्व काम देण्यात आले असून, ही नंबरप्लेट बसवण्यासाठी सुरुवात झाली आहे. पण वाहनचालकांचा अद्याप प्रतिसाद अद्याप मिळत नाही. आतापर्यंत सात ते आठ हजार वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. तर, तेवढ्याच वाहनांचे नंबर प्लेट बसविण्यासाठी अर्ज आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे शक्य नाही. त्यामुळे परिवहन विभागाने ही नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. 2019 पूर्वीच्या एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याचे आदेश आरटीओंनी काढले आहेत. परंतु वाहनधारकांकडून याला कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 30 एप्रिलनंतर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नसेल त्यांना दंड भरावा लागणार आहे. म्हणून वाहनचालकांनी प्रतिसाद द्यावा, आणि लवकरात लवकर नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एचएसआरटी नंबर प्लेटची किंमत काय…

.मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी 450 रुपये + जीएसटी 3 व्हीलरसाठी 500 रुपये + जीएसटी फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये + जीएसटी

नंबर प्लेट कुठे मिळेल…

transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.

यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा.

आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल.

अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा…

शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये. इतर ठिकाणाहून एचएसआरपी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. वाहन प्रणालीत आपली एचएसआरटी पेंडींगवर दिसेल. त्यामुळे अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा.

इतरांना शेअर करा

ताज्या बातम्या

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!