
लोकनीती न्यूज मीडिया
पुणे : MCES Institute of Pharmacy या नामवंत औषधनिर्माण शिक्षण संस्थेच्या लुबना रफिक शेख हिने डिप्लोमा इन फार्मसी परीक्षेत ८६.३६% गुण मिळवून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, लुबना तिच्या महाविद्यालयातही प्रथम क्रमांकावर आहे.लुबनाच्या या उल्लेखनीय यशामुळे MCES Institute of Pharmacy चे नाव उज्ज्वल झाले असून, शिक्षकवृंद, पालक आणि मित्रपरिवाराने तिचे भरभरून कौतुक केले आहे. तिच्या अथक मेहनतीचे आणि जिद्दीचे हे फलित असून भविष्यातील तिच्या वाटचालीसाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

या घडामोडीबाबत बोलताना लुबना म्हणाली, “ही यशाची सुरुवात आहे. माझे ध्येय फार्मसी क्षेत्रात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचं आहे. हे यश माझ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि संस्थेचे प्रेरणादायी मार्गदर्शनामुळेच शक्य झालं.”