|

लोयोला हायस्कूल तंबाखूमुक्त शाळा घोषित

लोकनीती न्युज नेटवर्क
पाषाण : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, शालेय शिक्षण विभाग (म.रा.) आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत लोयोला हायस्कूल, पाषाण याला तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या १०० यार्ड परिसरात पिवळी रेषा रेखांकित करून धूम्रपान निषिद्ध क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच, शाळेच्या मुख्याध्यापकांनी तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस जारी केली आहे. शालेय शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली तंबाखूमुक्त शाळेचे नऊ निकष पूर्ण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी कलाशिक्षिका भारती रंगनाथ भगत यांच्या पुढाकाराने विविध उपक्रम राबविण्यात आले. चर्चासत्र, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी विशेष जनजागृती उपक्रम यांचा समावेश होता.

या उपक्रमांचे डाएट प्राचार्य महेश शेंडकर, प्रभाकर क्षीरसागर (डाएट वरिष्ठ अधिव्याख्याते), प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे, माध्यमिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर, औंध यूआरसीच्या वैशाली शेवाळे, सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक सारिका कदम, पुणे जिल्हा समन्वयक राकेश कसारे तसेच लोयोला हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर नेल्टन थॉमस यांनी कौतुक केले. तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे लोयोला हायस्कूलचे समाजप्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहे.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

error: Content is protected !!