
लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिंदे पूल ते गणपती माथा या मार्गावर असलेल्या पदपथावर खाजगी कंपनीने केलेले खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ववत न करता तसेचच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पदपथाची अवस्था अत्यंत ओबडधोबड झाली असून नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना नाईलाजास्तव मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. या रस्त्यावरून वाहने मोठ्या वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका सतत निर्माण होत आहे. यापूर्वी या भागात काही अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पावसाळा सुरु झाल्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून वाहनचालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर पदपथाची डागडुजी करून तो सुरळीत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
फूटपाथ नक्की कोणासाठी, लोकांना चालण्यासाठी का जी कम्पनी येईल त्यांना केबल टाकण्यासाठी. पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे तिथून लोकांना चालता येत नाही आणि दुसरीकडे लोकांना चालण्यासाठी फुटपाथ आहे तर तो खाजगी कंपन्यांनी उकरून ठेवल्यामुळे तिथूनही लोकांना चालता येत नाही त्यामुळे अशा कंपन्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे परंतु महानगरपालिका त्यांना कुठल्याही नियमावली देत नाही असे चित्र निर्माण झालं आहे.
राजीव पाटील
शहराध्यक्ष : भाजपा चित्रपट कामगार आघाडी