|

शिवणे परिसरात वाहतूक कोंडीमुक्तीसाठी कॅनॉल रोडच्या कामाला गती

लोकनीती न्युज नेटवर्क
शिवणे : शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पर्यायी कॅनॉल रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेत आयोजित बैठकीत मा. आमदार भीमराव तापकीर, स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, तसेच महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त व पथ अभियंता यांच्यासह सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेत नागरिकांच्या वाहतूक समस्यांबाबत गंभीर दखल घेतली गेली. या बैठकीनंतर गुरुवारी प्रत्यक्ष कॅनॉल रोडची पाहणी पुणे मनपा पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

यावेळी उपअभियंता भास्कर हांडे, कनिष्ठ अभियंता सीमा सोळंकी आणि पियूष बोंडे हे अधिकारी उपस्थित होते. अहिरे गेट ते अय्यप्पा मंदिर (कोपरे रोड) या मार्गाचे डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या रस्त्यामुळे मुख्य वाहतूक भार कमी होणार आहे. याचबरोबर नवनाथभाऊ दांगट चौक (शिंदे पूल), सर्वे नं. ९७ देशमुखवाडी ते कोपरे व कोंढवे धावडे पर्यंतचा कॅनॉल रस्ता विकसित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात भाजप नेते उमेश सरपाटील, अभिजीत धावडे, भगवान मोरे, निखिल दांगट, गजानन वानखेडे, गणेश पोळ, माऊली रायरेकर, रोहित परदेशी यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांपासून लवकरच दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इतरांना शेअर करा

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

विविध विषयांवर सखोल व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे ‘लोकनीती न्यूज’ हे मराठीतील श्रेष्ठ माध्यम आहे.

All content, images, and materials published on Lokniti News are provided for general information and public awareness purposes only. While every effort is made to ensure accuracy and authenticity, Lokniti News does not make any warranties, express or implied, regarding the completeness, reliability, or accuracy of the information. All images, videos, and other media used on this website are either created by Lokniti News, used with permission, or believed to be in the public domain. If any copyrighted material has been used inadvertently, it is purely unintentional. The concerned copyright owner may contact us for correction or removal. Unauthorized use, reproduction, or distribution of any content from this website is strictly prohibited and may invite legal action under the Indian Copyright Act, 1957. By accessing this website, you agree that any disputes arising out of or related to its use shall be subject to the exclusive jurisdiction of the courts at Pune, Maharashtra, India. © 2025 Lokniti News. All Rights Reserved.

error: Content is protected !!