
लोकनीती न्यूज मीडिया
पुणे : एसएनडीटी कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, पुणे येथील वाणिज्य विभागाच्या वतीने दिनांक २९ जुलै २०२५ रोजी ‘कॉस्ट अकाउंटंट (CMA) म्हणून करिअर’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया – पुणे चॅप्टर यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमात सीएमए श्री. चैतन्य मोहरिर व श्री. संदीप जोशी यांनी विद्यार्थिनींना CMA कोर्सची रचना, अभ्यासक्रम, परीक्षा प्रणाली, आणि उद्योग व सरकारी क्षेत्रातील करिअर संधी याविषयी सखोल माहिती दिली. सत्राच्या उत्तरार्धात विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

या कार्यक्रमास १०२ विद्यार्थिनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्राचार्य प्रा. डॉ. भरत व्हनकटे, डॉ. अशोक कोकाटे (विभागप्रमुख) व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शवली.विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केले असून, भविष्यात अशा अनेक मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.